म्हारोळा येथे शिवजयंती निमित्त शाहीर सुनिल वाघचौरे यांचे प्रबोधन

पैठण २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिव शाहीर श्री सुनील वाघचौरे यांचे शिवजयंती निमित्त म्हारोळा येथे व्याख्यान संपन्न झाले.शिवरायांचे जिवन चरित्र सादर करुन आपल्या शाहिरीतुन शिवरायांचा पवाडा सादर केला.राजमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले,माता रमाई यांच्या जिवन कार्याची गायन व प्रबोधनाच्या माध्यमातून उजाळा देत.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एकत्रित जमलेल्या ग्रामस्थांना महापुरुषांच्या महान कार्याची व्यथा सांगून सुनील वाघचौरे यांनी समाज प्रबोधन केले यावेळी म्हारोळा उपसरपंच रंगनाथ जिजा जाधव , ग्रा प सदस्य बाळू गरड, ग्रा प सदस्य सनिल बर्फे, शिवजयंती उत्सव अध्यक्ष दत्ता यव्हारे, शिव शाहिर सुनिल वाघचौरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी शिवजयंती निमित्त २०२४/२५ वर्षां मध्ये नवनिर्वाचित विविध क्षेत्रात शासकीय सेवेत यशप्राप्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा नवतरुण तरुणी यांचा व त्यांच्या पालकांचा श्रीफळ शाल देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मोत्सव समिती व समस्त म्हारोळा ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करतात आला होता.