ज्ञानेश्वर तांबे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

२६ फेब्रुवारी रोजी दया समर्पन फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य पैठण तालुका अध्यक्ष तसेच दैनिक मराठवाडा केसरीचे उपसंपादक ज्ञानेश्वर तांबे रा.डोणगाव येथील रहिवासी यांना दया समर्पण फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. बजाजनगर येथे संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमात तांबे यांच्या सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील योगदानाबद्दल सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते राम निकाळजे व दया समर्पण फाउंडेशनच्या आयोजक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्ञानेश्वर भाऊसाहेब तांबे यांनी कोरोना काळात ही चांगल्या प्रकारे कार्य केल्याने. सामाजिक कार्य लक्षात घेता त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्ञानेश्वर तांबे यांना जीवनगौरव पुरस्कार श्री क्षेत्र जांबरखेडा येथील श्रीकृष्ण गो अभय तिर्थ गो शाळा चे अध्यक्ष तातेराव महाराज बारशे, राजकीय नेते व संघटनेचे पदाधिकारी, मित्रपरिवार नातेवाईक, पत्रकार मंडळी, डोणगावचे समाजसेवक रामकिसन भाऊ तांबे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वतीने मुख्याध्यापक रमेश मुळे सर दैनिक मराठा केसरीचे संपादक छबुराव ताके, सूर्यावार्ता चे संपादक प्रकाश सातपुते या विविध दैनिकाचे संपादक व पत्रकार संघटनेच्या या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर तांबे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.