घरफोडी चोरी गंभीर स्वरुपाचे १० गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
अजहर खान अन्वर खानला मोपेड स्कुटीसह जवाहर नगर पोलीसांनी केले अटक

११ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजेच्या दरम्यान ESP वॉईन शॉप, विभागीय क्रिडा संकुल, गारखेडा परीसर, छत्रपती संभाजीनगर. समोर फिर्यादी नाव गणेश अशोक तेलुरे वय २४ वर्ष, धंदा-शिक्षण, रा. विजय नगर, ग.नं १, प्लॉट नं ४६, छत्रपती संभाजीनगर यांची ॲक्टिव्हा ५ जी क्रमांक एम एच २०.एफ एफ ६६७८ पांढऱ्या रंगाची ही गाडी लावुन समोरील दुकानात गेले असता, व परत आल्यानंतर ॲक्टिव्हा मोपेड फाय जी लावलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही. फिर्यादी यांनी गाडीचा आजुबाजुला शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाही. चोरीस गेल्या बाबत पोस्टे जवाहरनगर गुरनं- २१,२०२५ कलम-३०३ /२ भा. न्या. संहिता प्रमाणे गुन्हा दाखल केला होता २८/फेब्रुवारी रोजी विशेष पथकाचे पोलीस अंमलदार मारोती गोरे, व मोफतलाल राठोड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, एक इसम चोरीची पांढऱ्या रंगाची ॲक्टिव्हा फाय जी ही वाणी मंगल कार्यालय शिवाजीनगर येथे विकण्यासाठ आली असता गाडी बाबत पोलीस यांनी विचारले असता सदर गाडी मी विकत घेतली आहे. व गाडीचे कागदपत्रा बाबत विचारले असता भावाकडे कागदपत्र आहेत. असे उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने. सदर गाडीसह संशयीत इसमास पोस्टेला घेवुन आलो असता, त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली केली, त्याने सदरची ॲक्टिव्हा गाडी ही ESP वॉईन शॉप, विभागीय क्रिडा संकुल, समोरुन चोरी केल्याची कबुली दिली. व त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव अझर खान अन्वर खान वय-२६ वर्ष, धंदा- मजुरी, रा. काबरानगर ग.नं-०६, परवेज किराणा दुकान जवळ छ. संभाजीनगर. असे सांगीतले.आरोपी याचेवर यापुर्वी मोबाईल लुटमारीचे, चोरीचे, घरफोडीचे एकुन-१० गुन्हे छत्रपती संभाजी नगर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार साहेब, मा. पोलीस उपआयुक्त श्री. नितीन बगाटे IPS परिमंडळ-०२, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. रणजीत पाटील साहेब, उस्मानपुरा विभाग, वरिष्ट पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोउपनि प्रशांत मुंढे, सफौ, शिंगाणे, तपासिक अमलदार स.फौ. निंभोरे, पोह शोनपवार, क्षिरसागर, पोअ/मारोती गोरे, मोफतलाल राठोड श्रीकांत काळे, यांनी उकृष्ट कामगीरी केली आहे.