महाराष्ट्र ग्रामीण
एच पि एल शाळेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
IAS अधिकारी डॉ.कु.श्रद्धा दिलीप नरवडे चितेगाव यांचा सत्कार

पैठण तालुक्यातील बिडकीन येथील एच पि एल शाळेतील
- इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित IAS अधिकारी डॉ.कु.श्रद्धा दिलीप नरवडे चितेगाव यांचा सत्कार करण्यात आला.निरोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बिडकीन पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.निलेश शेळके ,संत एकनाथ विद्यालयाचे शिक्षक श्री.दिलीप नरवडे सर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी एच.पी. एल विद्यालयाचे प्राचार्य श्री संभाजी जाधव सर हे होते. विद्यार्थी अभिषेक बाकडे,रोहिणी गिऱ्हे, आलिया शेख, शिफा शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पी.पी.सपकाळ यांनी केले.यावेळी श्री सुजित देशमुख (मुख्याध्यापक किलबिल प्राथमिक शाळा) विद्यालयातील शिक्षक श्री.विनोद तेजिनकर,श्री.दीपक मोरे,श्रीमती लता तांबोळी मॅडम व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.तर आभार श्री.विजय आवने सर यांनी आभार व्यक्त करुन विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ..