बिडकीन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
अहिल्याबाई होळकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा लवकरच

पैठण तालुक्यातील बिडकीन येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शिव अभिषेक ५१. जोडप्याच्या हस्ते शिव अभिषेक सोहळा संपन्न करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना जिल्हाध्यक्ष काकासाहेब टेके , मधुकर सोकटकर , आनंदा ठाणगे , सतीश हाडे , डॉक्टर गणेश शिंदे , कांताभैया डोळस , आकाश वंजारे , नितीन ठाणे , अंकुशजिजा धर्मे , भगवानदादा सर्जे , विशाल हाडे , राहुल काळे , बबन शिंदे , दीपक शिंदे , महेश वाघमारे , ज्ञानेश्वर कांबळे , यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदिपान पाटील भुमरे यांच्या हस्ते पूजन करून जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी खासदार भुमरे म्हणाले की बिडकीन करांनी मला भरभरून सहकार्य केले त्यामुळे मी बिडकीन कराचे उपकार कधीच विसरणार नाही एक वर्षापूर्वी गावकऱ्यांची मागणी केली होती की गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा ही मागणी मी पूर्ण केले असून अहिल्याबाई होळकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा लवकरच बिडकीन मध्ये उभारण्यात येईल असे त्यांनी सांगितले यावेळी बिडकीनच्या सरपंच अशोक धर्मे मधुकर सोकटकर , काकासाहेब टेके बबनराव ठाणगे , नन्हेखा पठाण , आनंदा ठाणगे , कल्याण शिंदे , किरण गुजर , डॉक्टर गणेश शिंदे , अंकुश काळे , कांता डोळस , किसनलाल तोतला , दीपक शिंदे , चिमण जाधव , नितीन वाघ , सागर ठाणगे , प्रवीण चव्हाण , अशोक टेके , डॉक्टर दीपक गायकवाड , ज्ञानेश्वर कांबळे , राहुल काळे , आकाश वंजारे , आकाश धर्मे ,यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने संख्येने उपस्थित होते.